पुणे शहरात दुचाकींसाठी वेगळे रस्ते बनविणार - शेखर गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पुणे महापालिकेच्या विकासकामांमध्ये शेखर गायकवाड यांचा अनुभव फायदेशीर ठरेल. ते पुण्याच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण काम करण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतः जाऊन माहिती घेत आहेत. त्यामुळे ते आपल्या कामाचा नक्कीच ठसा उमटवतील. पुणेकरांनी त्यांना साथ द्यावी.
- चंद्रकांत दळवी, निवृत्त जिल्हाधिकारी

पुणे - ‘पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य देणार आहे. दुचाकी वाहनांसाठी वेगळे रस्ते तयार करणार आहे,’’ असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भूमाता रौप्य महोत्सवी सांगता कार्यक्रमात गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. निवृत्त जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, भूमाता संस्थेचे डॉ. बुधाजीराव मुळीक, शालिनी मुळीक, निवृत्त कर्नल संभाजी पाटील उपस्थित होते.

आयुक्त गायकवाड म्हणाले, ‘‘प्रशासनात मला प्रत्येक माणसाने शिकविले. एक एक माणूस शिकवीत आला आणि मी शिकत आलो. त्यामुळे पुणे महापालिका आयुक्त म्हणून कितीही लोक मला भेटायला आले तरी मी न कंटाळता काम करणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेमध्ये स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार आहे. ‘सीएसआर’मधून निधी उभा करून पर्यावरणपूरक बस घेण्यावर भर देणार आहे.’’ नरेंद्र शिंदेकर यांनी  प्रास्ताविक केले. प्रियांका जगताप यांनी सूत्रसंचालन केले. कमल सावंत यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independent road for two wheeler in pune city