

Global Impact Forum 2026
sakal
झुरिक (स्वित्झर्लंड) : उत्पादननिर्मिती क्षेत्रात होत असलेल्या मूलभूत बदलांकडे ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘एपी ग्लोबाले’ यांच्यावतीने आयोजित पहिल्या ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’मध्ये (जीआयएफ) तज्ज्ञांनी लक्ष वेधले. उत्पादननिर्मितीच्या व्याप्ती (स्केल) पेक्षा बुद्धिमत्ता (इंटेलिजन्स) येत्या काळात अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
उद्योग, वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि शाश्वत विकास यांचा भविष्यातील प्रवास कसा बदलणार आहे, यावर ‘उद्योगांची पुढची दिशा’ या सत्रात चर्चा झाली. भारत-स्विस केंद्राचे अध्यक्ष गोविंद सोवाळे यांनी तज्ज्ञांना बोलते केले. या सत्रात अॅक्सेन्चर (मॅन्युफॅक्चरिंग) चे व्यवस्थापकीय संचालक एन्नो डांके, एलजीटी प्रायव्हेट बँकेचे (वित्तीय सेवा) मुख्य कार्यपालन अधिकारी ऑलिव्हर जेनी, न्युएश डेव्हलपमेंटचे (शाश्वत रिअल इस्टेट) अँड्रियास बिंकेर्ट, आणि रेव्हमॅक्स ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रमुख कौस्तुभ बुटाला यांनी आपले विचार मांडले.