
पुणे : ‘‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०३६ मधील ऑलिंपिक स्पर्धा भारतात व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे देशाला ऑलिंपिक स्पर्धेत अधिकाधिक पदके मिळवून देणारे खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी खेळाडूंची तयारी करवून घेण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला पाहिजे. त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल,’’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.