
पुण्याची लिटल कॅल्क्युलेटर ‘इंडिया बुक’मध्ये
पुणे : गणितीय आकडेमोड म्हटली तर भल्याभल्यांची मती गुंग होते. पण पुण्यातील एका सहा वर्षाच्या मुलीने केवळ पाच मिनिटात तब्बल १०० गणिते सोडवली आहे. तिच्या या अनोख्या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. हडपसर येथील ईशानी अक्षय ढोरे या पुण्याच्या लिटल कॅल्क्युलेटरने नुकतेच हा विक्रम प्रस्थापित केला आहे. तीने पाच मिनीट ३३ सेकंदात हा विक्रम पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे ईशानीच्या आईनेच तीला अबॅकसचे प्रशिक्षण दिले.
तीच्या या अनोख्या विक्रमाबद्दल आई श्वेता सांगतात, ‘‘मुलांना लहान वयातच अबॅकसचे शिक्षण दिले. तर त्यांच्या पुढील शिक्षणातील गुणवत्तेत बरीच प्रगती होते. ईशानीचा सुरवातीपासूनच गणितातील ओढ होती. मागील आठ महिन्यांपासूनच ती अबॅकस शिकत असून, मागील तीन महिन्यांपासून ती इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करत होती.’’ नुकतेच यासंबंधीचे प्रमाणपत्र ईशानीला प्राप्त झाले आहे. सध्या ती ‘अमनोरा पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकते आहे.
ईशानीने केलेला हा विक्रम आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. तिला अबॅकसचे प्रशिक्षण देण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला आहे. आमचे स्वप्न तिच्यावर न लादता, तीला ज्यात आवड आहे. अशा क्षेत्रात करिअर करण्यासाठी आम्ही तिला प्रोत्साहित करत आहे.
- श्र्वेता ढोरे, ईशानीच्या आई.
Web Title: India Book Of Records Six Year Old Girl From Pune Solved 100 Maths In Just Five Minutes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..