

Defence Licensing
esakal
प्रज्वल रामटेके
पुणे: जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दारूगोळा, स्फोटके आणि प्रणोदक (प्रोपेलंट) यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अनेक देशांतील दारूगोळ्याचा साठा वेगाने संपुष्टात येत असून, ही भारतीय संरक्षण उद्योगासाठी मोठी सुवर्णसंधी आहे. देशांतर्गत उद्योगांना या संधीचा लाभ घेता यावा आणि ‘व्यवसाय सुलभता’ (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) वाढावी, यासाठी उद्योग परवान्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. पूर्वी साधारण सहा महिने लागणारी ही मंजुरी प्रक्रिया आता केवळ एका महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार यांनी दिली.