
पुणे : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली जैविक-वैद्यकीय संस्था ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ (आयसीएमआर)ने मलेरियाविरोधी ‘रिकॉम्बिनंट काइमेरिक मल्टी-स्टेज मलेरिया लस’(अॅडफॅल्सिवॅक्स) ही नवी लस विकसित केली आहे. मलेरिया परजीवीवर त्याच्या जीवनचक्रातील विविध टप्प्यांवर एकाच वेळी आघात करणारी व जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेली प्रगत लस असून, या लशीचे उत्पादन करण्यासाठी इच्छुक कंपन्या व उत्पादकांना पुढे येण्याचे ‘आयसीएमआर’ने आवाहन केले आहे. त्यामुळे लवकरच भारताला मलेरियावरील लस मिळू शकणार आहे.