

पान १
--------
आय लव्ह माय इंडिया!
--------
भारतीय स्वातंत्र्य चिरायु होवो!
---------
शनिवारी- १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन आहे. १९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीतून आपला देश मुक्त झाला, त्याला ७९ वर्षे पूर्ण होत आहेत. देशभर शनिवारी स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष केला जाईल, तसाच तुमच्याही शाळेत तो साजरा केला जाईल. या निमित्ताने, भारतातील कोणत्या गोष्टींचा अत्यंत अभिमान वाटतो, असे तुम्हाला विचारले, तर तुमचे उत्तर काय असेल?...
भारताचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील विविधता आणि विविधतेतील एकता! विविध धर्म, संस्कृती व परंपरांच्या लोकांनी मिळून बनलेला आपला देश. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलो, तर भाषा बदलते; तर अनेकदा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यावरही बोलीभाषेतील फरक जाणवतो. अन्न, पोषाख, सण, परंपरा, संगीत किती वेगळे. निसर्गाची वेगवेगळी रूपे आणि काळानुरूप विज्ञान-तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत आपण केलेली प्रगतीसुद्धा. ही विविधता अभिमानाने जपावी आणि जगाला सांगावी अशीच. चला, आज हीच समृद्धी साजरी करूया आणि म्हणूया- ‘आय लव्ह माय इंडिया!’
----------
भाषावैविध्य व साहित्य-सुपिकता
- २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १२१ प्रमुख भाषा आहेत. मातृभाषा व बोलीभाषांची संख्या आणखी खूप जास्त आहे. देशात २२ अनुसूचित भाषा आहेत , तर ११ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
- प्रत्येक भाषेनुसार साहित्याची मजा वेगळी आहे. आर्ष महाकाव्यांपासून आताच्या आधुनिक लेखनापर्यंत अनेक भाषांमध्ये विपुल साहित्य निर्माण झाले आहे. त्या साहित्याला त्या-त्या प्रदेशाचा खास स्वाद आहे.
-----------
अन्नवैविध्य
भारताची अशी एकच खाद्यसंस्कृती नाही. कारण इथे प्रत्येक जिल्ह्याची व प्रत्येक राज्याची खासियत वेगळी आहे. हे अन्न-वैविध्य आपण सगळ्यांनी अनुबवून साजरे करण्याजोगेच हे. शिवाय त्याने आपल्या देशाला जगातिक स्तरावर खास ओळख प्राप्त करून दिली आहे.
-----------
प्रदेशवैविध्य
गुजरातच्या २६००० चौरस किलोमीटर प्रदेशावर पसरलेल्या ‘कच्छच्या रणा’पासून ईशान्य भारतातील स्वच्छ डोंगर-दऱ्या आणि जंगलांपर्यंत... उत्तुंग हिमालयापासून लांबलचक सागरकिनाऱ्यापर्यंत... एकाच देशात इतके प्रदेशवैविध्य जगात सगळीकडे नाही. डोळे विस्फारून पाहात राहावे अशी पर्यटनस्थळे आपल्या देशातच इतकी आहेत, की कितीही भटकलो, तरी ‘अजून पाहायचे राहिलेच’ अशी अनेक ठिकाणे असतील.
-------------
युनेस्को ‘जागतिक वारसा स्थळे’- ४५
-------------
आधुनिकता
‘चांद्रयान-३’ चे चंद्रावर करण्यात आलेले यशस्वी ‘सॉफ्ट लँडिंग’ आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची ‘आदित्य- एल १’ ही मोहिम, यांविषयी आपण यापूर्वी माहिती घेतलीच आहे. भारताने इतिहास कायम मनात जागा ठेवला, त्याचा अभिमान बाळगला, परंतु डोळ्यांसमोर भविष्याची आशाच बाळगली. त्याचीच ही अभिमानास्पद उदाहरणे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंत देशात झालेली विज्ञान-तंत्रज्ञानविषयक प्रगती पाहिली तर आपल्या या दृष्टिकोनाची प्रचिती येते. त्याशिवाय ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थां’सारख्या अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था देशाची मान उंचावतात.
विज्ञान संशोधनविषयक काही अत्यंत महत्त्वाच्या संस्था-
- भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)
- भाभा अणू-संशोधन केंद्र (बीएआरसी/ डीएई)
- संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)
- भारतीय कृषी-संशोधन परिषद (आयसीएआर)
- वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)
- भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर)
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.