Global Impact Forum 2026 : ईएसजी आणि शाश्वत विकास; उद्योगांसाठी जोखीम नव्हे, संधी

ESG sustainable development : ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’मध्ये तज्ज्ञांनी सांगितले, की ईएसजी आणि शाश्वत विकास खर्च नव्हे तर भारतासाठी दीर्घकालीन व्यवसाय संधी आणि सामाजिक लाभ आहेत.
Global Impact Forum 2026

Global Impact Forum 2026

esakal

Updated on

India ESG sustainable development business opportunities 2026 : शाश्वत विकास आणि ‘ईएसजी’ (पर्यावरणीय, सामाजिक आणि शासन) या संकल्पना केवळ नियमपालन किंवा अतिरिक्त खर्च म्हणून न पाहता, त्या नव्या व्यवसाय संधी आणि दीर्घकालीन विकासाचा पाया म्हणून स्वीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘एपी ग्लोबाले’ यांच्यावतीने आयोजित पहिल्या  ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’मध्ये  (जीआयएफ) करण्यात आले.

‘ईएसजी आणि शाश्वत विकास’ या सत्रात सरकार, उद्योग, ऊर्जा, शहरी नियोजन आणि पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रांतील जागतिक अनुभव मांडण्यात आले. या सत्रात पीओएम प्लस कन्सल्टिंगचे भागीदार योहान्स गॅन्टनर, एलारिया ड्यू एजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ऑटो सी. फ्रॉमेल्ट, इंटिग्रेटेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे डॉ. हॅनेस झांडर, स्पॉन्ज कोलॅबोरेटिव्हचे संचालक सौरव कुमार बिस्वास, एसकेवायआय बायोपॉलिमरचे पार्टनर डॉ. सचिन जैन आणि एलोरा ईपीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर नंदन यांनी आपले विचार मांडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com