

Global Impact Forum 2026
esakal
trade and economic partnership agreement : भारत आणि युरोपमधील व्यापार व गुंतवणुकीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणाऱ्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारामुळे (ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप अॅग्रीमेंट - टेपा) उभय घटकांना व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘एपी ग्लोबाले’ यांच्यावतीने आयोजित पहिल्या ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’मध्ये (जीआयएफ) तज्ज्ञांनी केले.
भारत–युरोप आर्थिक संबंधांची पुढील दिशा, मुक्त व्यापार आणि गुंतवणूक या विषयावरील सत्रामध्ये स्विस ग्लोबल एंटरप्राइजच्या वरिष्ठ संचालक सिर्पा त्सिमल, पीडब्लूसीचे पार्टनर अॅडव्हायझरी प्रफुल्ल शर्मा, पीडब्लूसीचे संचालक रेटो सेइबोल्ड आणि स्विस–इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष फिलिप एम. राईश यांनी आपले विचार मांडले.