विजय वडेट्टीवार
केंद्र सरकारच्या
परराष्ट्र धोरणामुळे नुकसान
विजय वडेट्टीवार यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ७ : ‘अमेरिका आणि इस्राईलने इराणवर सुरू केलेल्या हल्ल्याची झळ आता थेट भारताला पोहोचू लागली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देशावर ही नामुष्की ओढवली आहे. रशियाकडून तेल घेण्याबाबत अमेरिका अटी घालत आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर देश चालणार असेल, तर ही भारताच्या अधोगतीची वाटचाल आहे,’ असा घणाघाती आरोप विधानसभेतील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना येथे केला.
वडेट्टीवार म्हणाले, इस्रायलने युद्ध छेडण्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान त्या देशाचा दौरा करून येतात, हे संशयास्पद आहे. एकप्रकारे पंतप्रधानांना या युद्धात ''ट्रॅप'' करण्यात आले असून, त्याचा मोठा फटका आता देशाला सोसावा लागत आहे. रशियाकडून तेल घेण्याबाबत भारताने केवळ ३० दिवसांचा करार करणे, हे अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्यासारखेच आहे. भारताने आपले स्वतंत्र धोरण राखणे आवश्यक होते, मात्र सध्याचे राज्यकर्ते दबावाखाली काम करत असल्याचे चित्र आहे. वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, कमर्शिअल गॅस कनेक्शन धारकांना सिलिंडर मिळणे कठीण होणार असेल, तर हॉटेल इंडस्ट्री पूर्णपणे कोलमडून पडेल. यामुळे कोरोना काळासारखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची भीती असून, सामान्य जनतेचे जगणे कठीण होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या प्रकरणातील सत्यता बाहेर काढण्यासाठी रोहित पवार हे राहुल गांधी यांची भेट घेत आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राहुल गांधी रोहित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

