

‘भारत फोर्ज’चा ‘एमब्रेअर’शी करार
एअरोस्पेस क्षेत्रात मोठी कामगिरी, लँडिंग गिअर फोर्ज्ड घटकांचे उत्पादन
पुणे, ता. १२ ः भारत फोर्ज कंपनीने विमानांच्या लँडिंग गिअरसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या फोर्ज्ड (घडवलेल्या धातूच्या) भागांचे उत्पादन आणि पुरवठा करण्याबाबत एमब्रेअर या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत दीर्घकालीन करार केला आहे. फोर्ज्ड घटकांसाठी ‘एमब्रेअर’च्या जागतिक एअरोस्पेस पुरवठा साखळीत सहभागी होणारी भारत फोर्ज ही भारतातील पहिली पुरवठादार कंपनी ठरली आहे.
भारतातील एखाद्या कंपनीसोबत झालेला ‘एमब्रेअर’चा हा पहिलाच करार आहे. या करारानुसार, ‘एमब्रेअ’रच्या व्यावसायिक आणि संरक्षक विमानांच्या लँडिंग गिअर सिस्टीमसाठी उच्च दर्जाचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे फोर्ज्ड घटक भारत फोर्ज ही कंपनी पुरवेल. या करारामुळे जागतिक विमान उद्योगातील पुरवठा साखळीत ‘भारत फोर्ज’चा सहभाग वाढणार आहे. त्याचप्रमाणे जटिल आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून ‘भारत फोर्ज’ची भूमिका अधिक मजबूत होणार आहे.
या कराराबाबत ‘भारत फोर्ज’चे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, “बीएफएल ही ‘एमब्रेअर’साठी फोर्ज्ड घटक पुरवणारी पहिली भारतीय कंपनी ठरणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या एअरोस्पेस व्यवसायात आम्ही विकसित केलेल्या क्षमतांचे हे प्रतीक आहे. पुढील काळात या भागीदारीत अधिक वाढ करून त्यात अधिक मूल्य निर्माण होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हा करार महत्त्वाच्या संरचनात्मक घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता निर्माण करण्यास मदत करेल. ”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.