

कोलकता, ता. २३ (पीटीआय) : ‘‘भारत जागतिक जहाजबांधणी केंद्र बनण्यास सक्षम असून, जागतिक जहाजबांधणी क्षेत्रातील निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची संधी भारताने साधली पाहिजे,’’ असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी सांगितले.
कोलकता येथून राजनाथसिंह यांनी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) आणि यंत्र इंडिया लिमिटेडच्या विस्तारित पाच प्रकल्पांची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे केली. या वेळी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पांमध्ये जीआरएसईचे तीन आणि यंत्र इंडिया लिमिटेडचे दोन प्रकल्प आहेत.
पश्चिम बंगालमध्ये सुमारे तीन हजार ५०० कोटी रुपयांच्या पाच प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारत जागतिक जहाजबांधणी केंद्र बनण्यास सक्षम आहे. जागतिक जहाजबांधणी उद्योगात पोकळी निर्माण होत आहे. ही संधी भारताने साधली पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी या अनुषंगाने नक्कीच पावले उचलेल. ‘‘पूर्वी पश्चिम बंगालमध्ये कारखाने बंद पडल्याच्या आणि टाळेबंदीच्या बातम्याच येत असत, आता त्यांची जागा राज्यात नवे प्रकल्प सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत,’’ असे राजनाथसिंह म्हणाले.
दरम्यान, ‘जीआरएसई’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीने क्षमतावाढीचा भाग म्हणून कोलकता येथील ‘एसएमपीके’ बंदर व्यवस्थापनाशी, हुगळी नदीच्या दोन्ही तीरांवरील दोन लघु जहाजबांधणी केंद्रांसाठी करार केले आहेत. तसेच रायचक येथील नदीकाठची ३२ एकर जमीनही कंपनीला उपलब्ध झाली आहे. यामुळे युद्धनौकांच्या बांधणी आणि दुरुस्तीची क्षमता वाढणार आहे.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फायदा
या प्रकल्पांमुळे जीआरएसईची क्षमता मजबूत होण्याबरोबरच रोजगारनिर्मिती आणि पूरक उद्योगांना, विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई), अधिक संधी मिळून पश्चिम बंगालच्या औद्योगिक परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाला चालना मिळेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.