म्यानमारच्या शांतता प्रक्रियेला भारताचा पाठिंबा ः जयशंकर
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.४ ः म्यानमारकडून पुढाकार घेत त्या देशात राबविल्या जाणाऱ्या शांतता प्रक्रियेला भारताचा पाठिंबा राहील, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी केले. भारताच्या मदतीने यांगून येथे उभारण्यात आलेल्या साहित्य केंद्र इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आभासी पद्धतीने मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शेजारी प्रथम, ॲक्ट ईस्ट आणि प्रादेशिक सुरक्षा तसेच विकास’ या त्रिसूत्रीच्या आधारावर भारत म्यानमारबरोबर आपले संबंध वृद्धिंगत करू इच्छितो. म्यानमारमधील शांतता दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या स्थिरतेसाठी आवश्यक असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमा एक हजार ६४० किलोमीटर लांबीची असून ईशान्य भारतातील अनेक राज्ये म्यानमारला लागून आहेत. २०२१ मध्ये लष्कराने सत्ता काबीज केल्यापासून म्यानमार हिंसाचार ग्रस्त आहे. अलीकडील काळात लष्कराचे समर्थन प्राप्त असलेल्या पक्षाने या देशात सत्ता हस्तगत केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

