

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ६ ः ‘‘जम्मू काश्मीर आणि लडाखसह देशाचा संपूर्ण भाग भारताच्या अधिकृत नकाशाप्रमाणे जगाच्या नव्या नकाशात दर्शवला जाणे गरजेचे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. चुकीच्या किंवा भ्रामक पद्धतीने भारताचे भाग दर्शवणे आम्हाला मंजूर नाही. याच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही,’’ अशी भूमिका रविवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून मांडण्यात आली.
देश आणि महाद्वीपांचा आकार त्यांच्या खऱ्या क्षेत्रफळाच्या अनुसार जगाच्या नकाशावर दाखवण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाने घेतला होता. यासंदर्भात आलेल्या प्रस्तावाच्या बाजूने भारताने मतदान केले होते. याचा अर्थ एका खास प्रकारच्या नकाशाला मंजुरी देणे असा होत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जगाचा नकाशा नव्या पद्धतीने दाखवण्याचा प्रस्ताव गत शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने मंजूर केला होता.
‘‘भारताचा आक्षेप नव्या पध्दतीच्या नकाशाला नाही तर भारतीय क्षेत्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्याला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव कोणताही विशेष नकाशा, नकाशा बनवण्याची पद्धत किंवा देशांच्या सीमांना मंजुरी देत नाही. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखसह देशाचा संपूर्ण भाग हा भारताच्या अधिकृत नकाशाप्रमाणेच दर्शवण्यात आला पाहिजे. भारतीय क्षेत्राचे कोणतेही भ्रामक आणि चुकीचे चित्रण स्वीकारले जाणार नाही,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.