प्राथमिक ऊर्जावापरात भारत तिसऱ्या स्थानावर

सम्राट कदम -  सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

निसर्गतः मिळणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतांना प्राथमिक ऊर्जास्रोत म्हणतात. ही ऊर्जा मिळविण्यासाठी अत्युच्च तंत्रज्ञानाची गरज नसते. यामध्ये खनिज तेल, विद्युतधारा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा समावेश होतो.

पुणे - प्राथमिक ऊर्जावापरामध्ये भारताने जगात तिसरे स्थान पटकाविले आहे. तर, ऊर्जावापरातील दराच्या बाबतीत चीननंतर भारताने जगात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बीपी स्टॅटिस्टिक रिव्ह्यूव या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जगभरामध्ये कोळसा आणि तेलाची मागणी तुलनेने घटल्याचेही निदर्शनास आले आहे. जागतिक स्तरावर प्राथमिक ऊर्जावापराचा दर मागील वर्षी थोडा कमी होत १.३ टक्‍क्‍यांवर आला, हाच दर २०१८ मध्ये २.८ टक्के एवढा होता. जगभरात अपारंपरिक ऊर्जास्रोत आणि नैसर्गिक गॅसचा वापर वाढल्याचे अहवालातून स्पष्ट होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक प्राथमिक ऊर्जावापरात जवळ जवळ एकचतुर्थांश वाटा चीनचा आहे. त्या खालोखाल भारत आणि इंडोनेशियामध्ये प्राथमिक ऊर्जेचा वापर करण्यात येतो. 

ऊर्जावापराची वैशिष्ट्ये ः 
    खनिज तेलाच्या वापरात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर 
    जगातील कोळशाचा वापर घटला, भारतात फक्त ०.३ टक्‍क्‍याने वाढ
    जगभरात अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरात वाढ 
    जलविद्युतच्या निर्मितीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर 

प्राथमिक ऊर्जा म्हणजे काय?
निसर्गतः मिळणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतांना प्राथमिक ऊर्जास्रोत म्हणतात. ही ऊर्जा मिळविण्यासाठी अत्युच्च तंत्रज्ञानाची गरज नसते. यामध्ये खनिज तेल, नैसर्गिक गॅस, कोळसा, विद्युतधारा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा समावेश होतो.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India ranks third in the world in primary energy consumption

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: