

लोगो ः ‘सेमीकॉन इंडिया-२०२६’
हेड
चिप उत्पादनामध्ये
भारत सामर्थ्यशाली
सबहेड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
उद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १७ ः ‘‘जागतिक पातळीवर विश्वासार्ह सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र म्हणून भारताची क्षमता वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील पुरवठा साखळीचा वापर शस्त्र म्हणून होऊ नये यासाठी जागतिक चिप उत्पादकांनी देशाच्या क्षमतेचा विचार करावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यशोभूमी येथे आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘सेमीकॉन इंडिया- २०२६’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘‘या परिषदेतून भारताने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी स्वतःला एक नवे आणि विश्वासार्ह केंद्र म्हणून जगासमोर सादर केले आहे. जागतिक चिप उत्पादकांनी या संधींचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहनही मोदी यांच्याकडून करण्यात आले.
उद्घाटनपर भाषणामध्ये मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीचा संदर्भ दिला. ‘‘भगवान विश्वकर्मा हे निर्मिती आणि सृजनाचे प्रतीक आहेत. एका बाजूला भारताची शतकानुशतके जुनी निर्मितीची परंपरा आहे, तर दुसऱ्या बाजूला २१व्या शतकातील तंत्रज्ञान आहे. या दोन्हींच्या संगमातून आत्मनिर्भर आणि विकसित भारताची वाटचाल होत आहे,’’ असे त्यांनी सांगितले.‘‘गेल्या काही वर्षांमध्ये भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली आहे. आता प्रकल्पांच्या घोषणांपासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंतचा टप्पा गाठला आहे. सरकारने ‘सेमीकॉन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत बारा प्रकल्पांना मंजुरी दिली असून, त्यापैकी काही प्रकल्पांमध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू झाले आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले.
परिषदेतून
.......
६००
प्रदर्शक
......
३००
कंपन्या
.....
५० हून अधिक
सहभागी देश
.......
मुख्य संकल्पना ः ‘सिलिकॉन टू सिस्टिम्स : बिल्डिंग द इकोसिस्टिम’
- भारताचा फायदा जगाला
‘‘भारताने चिप डिझाइन, उत्पादन, उपकरणे, कच्चा माल, चाचणी आणि इतर आवश्यक सुविधांवर एकाच वेळी काम सुरू केले आहे. एखाद्या महत्त्वाच्या उद्योगात भारत यशस्वी झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण जागतिक पुरवठा साखळीला होतो. सध्या पुरवठा साखळ्यांचा वापर दबावाचे साधन म्हणून केला जात असताना त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले.
- कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर
ते म्हणाले, ‘‘ सेमीकंडक्टर उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर सरकारचा भर आहे. एक लाख अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या क्षेत्रासाठी प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७० हजार तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतात ‘फॅबलेस’ कंपन्यांची वाढ, बौद्धिक संपदा निर्मिती, ‘कंपाउंड सेमीकंडक्टर’ आणि ‘सिलिकॉन फोटोनिक्स’ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्याची गरज आहे.’’
- प्रदर्शनातून प्रगतीचे दर्शन
भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन या परिषदेमध्ये घडत आहे. कच्च्या मालापासून चिप निर्मिती, पॅकेजिंग, चिप डिझाइन आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीपर्यंतची संपूर्ण साखळी येथे पाहायला मिळत आहे. जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड, सिंगापूर आणि स्वीडन या देशांचेही स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.