

हैदराबाद, ता. १३ ः येथे सुरू असलेल्या ‘भारत समिट’ मध्ये ३१५ पैकी ११५ वक्त्यांना भारतात प्रवेश नाकारला. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार त्यांचे व्हिसाही रद्द करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आज केंद्राला धारेवर धरले. त्यांनी या निर्णयाच्या कायदेशीर वैधतेवरही त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या परिषदेच्या दुष्टीने ही निराशाजनक घटना असल्याचे सांगत वक्त्यांना रोखण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, की परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या परिषदेसाठी परवानगी दिलेल्या ३१५ पैकी ११५ वक्त्यांना भारतात प्रवेश नाकारला तसेच त्यांचा व्हिसाही रद्द करण्यात आला,हे मला हैदराबादेत आल्यावर समजले. सरकारने कोणत्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे हे कठोर पाऊल उचलले, हे पूर्णपणे अस्पष्ट आहे. मात्र, या परिषदेचा उद्या समारोप होत असल्याने हा निर्णय मागे घेणे अशक्य आहे. अभिमानास्पद लोकशाही असलेला देश इतका असुरक्षित झाला आहे की, आपल्यावर टीका करतील अशी भीती वाटणारे आवाज दाबण्याची वेळ त्याच्यावर आली आहे, ही खेदजनक बाब आहे.
दरम्यान, थरूर यांनी आज उद्घाटनाच्या दिवशी या परिषदेला हजेरी लावली. भारतासह जवळपास ७० देशांतील एक हजार प्रतिनिधी या दोन दिवसीय परिषदेत सहभागी झाले आहेत. उदयोन्मुख जागतिक व्यवस्था, त्याबाबत भारताची धोरणात्मक भूमिका, सहकारी संघराज्यवाद आणि निवडणुकांची निष्पक्षता या विषयांवर परिषदेत चर्चा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.