
पुणे : कच्च्या मालाच्या माध्यमातून किंवा इतर धातूंमध्ये मिश्र स्वरूपात सोन्याची आयात शुल्काची बचत करण्याचा प्रकार आता थांबणार आहे. सोन्याप्रमाणे आता या वस्तूंवरही समान शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे विविध प्रकारचे धातू आयात करून त्यावर एक ते दोन टक्के शुल्क भरत उर्वरित शुल्काची बचत करता येणार नाही.