

Planned urban tree plantation can significantly reduce pedestrian-level temperatures, with research showing up to a 5.6°C reduction in India.
sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : शहरांमधील वाढत्या उकाड्यावर मात करण्यासाठी केवळ मोठ्या संख्येने झाडे लावणे पुरेसे नसून, 'योग्य ठिकाणी योग्य झाड' लावल्यासच अपेक्षित थंडावा मिळू शकतो. अशा नियोजनबद्ध वृक्षलागवडीमुळे भारतातील शहरांमधील पादचारी पातळीवरील (रस्त्यावरील) तापमानात तब्बल ५.६ अंश सेल्सिअसची घट झाल्याचे एका जागतिक संशोधनातून समोर आले आहे. हवामान, शहराची रचना आणि झाडांचा प्रकार यांचा अचूक मेळ घातल्यास शहरी भागातील तापमान १२ अंशांपर्यंतही कमी होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.