भारत-संयुक्त अरब अमिराती (युएई) संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची नियुक्ती
YSH26B05088
धैर्यशील मोहिते पाटील
भारत-युएई संसदीय मैत्री
समितीवर मोहिते-पाटील
अकलूज, ता. २४ : भारत-संयुक्त अरब अमिराती (युएई) संसदीय मैत्री समितीच्या सदस्यपदी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संसदीय व राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा मैत्री गट आहे. अठराव्या लोकसभेच्या कालावधीसाठी भारताच्या संसदेत स्थापन करण्यात आलेल्या या मैत्री गटाच्या सदस्यपदी मोहिते पाटील यांची लोकसभा अध्यक्षांनी नियुक्ती जाहीर केली असून अधिकृत पत्राद्वारे माहिती देण्यात आली. भारत आणि युएई यांच्यात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विविध क्षेत्रांत घनिष्ठ संबंध आहेत. संसदीय मैत्री गटाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक बळकट होणार आहे.
भारत आणि युएई यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी संसदीय स्तरावर सकारात्मक भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणार आहे. सदरची संधी दिल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतो.
- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

