व्यापार करारात 
अटी कोणत्या?
<Br>

व्यापार करारात अटी कोणत्या? <Br>

Published on

व्यापार करारात
अटी कोणत्या?

शशी थरूर यांची सरकारला विचारणा 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता. ३ ः ‘‘भारत-अमेरिका व्यापार करारात नेमक्या कोणत्या अटी आहेत याची स्पष्टता नसून आमच्याकडे फक्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच  पोस्ट आहेत. संसदीय लोकशाहीत एवढे पुरेसे आहे का?’’ असा सवाल आज काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केला. 
‘‘भारत-अमेरिका करारात  काय आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे केंद्र सरकारने त्याची माहिती द्यावी. विरोधक फक्त स्पष्टता मागत आहेत. या करारात काय आहे, हे भारत सरकारने देशातील जनतेला सांगायला नको का? ट्रम्प म्हणतात की हा करार शेतीशी संबंधित आहे, तर मग भारतीय शेतकऱ्यांसाठी कोणती संरक्षणाची तरतूद आहे?  हा ५०० अब्ज डॉलर्सचा करार आहे, असेही ट्रम्प म्हणतात. पण पण भारताची एकूण आयातच सुमारे ७०० अब्ज डॉलर्सची आहे. मग उरलेल्या देशांकडून भारत आयात थांबवणार आहे का?’’ असे सवाल थरूर यांनी केले आहेत. हा खरोखरच चांगला करार असेल, तर त्याचे विरोधकही स्वागत करतील. पण त्याआधी सरकारने संपूर्ण माहिती आणि स्पष्टता देणे गरजेचे आहे, असे थरूर म्हणाले. 

शेतकऱ्यांसोबत विश्वासघात - रणदीप सुरजेवाला
‘‘भाजपने तीन काळे कृषी कायदे आणून शेती विकण्याचा डाव रचला आणि आता अमेरिकेचे सर्व कृषी उत्पादन भारतात शून्य टक्के करावर विकले जाणार आहेत. शेतकऱ्यांसोबत यापेक्षा मोठा विश्वासघात आणखी काय असू शकतो?’’ असा सवाल करत काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘‘अमेरिकेचा कापूस, मका, गहू, दुग्धजन्य पदार्थ, बदाम आणि सफरचंद जर भारतात कोणताही कर न लावता विकले गेले, तर मग भारतीय शेतकऱ्यांचे काय होणार?’’ असे सवाल सुरजेवाला यांनी केले आहेत. सरकारने पुढे येऊन हा करार संसदेत मांडला पाहिजे आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे. नेहमीप्रमाणे भाजप हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com