Trishul Military Exercise: सौराष्ट्र किनाऱ्यावर त्रिशुल सरावाचा समारोप
Indian Armed Forces: त्रिशुल युद्धाभ्यासातून भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाची संयुक्त ताकद आणि उभयचर लँडिंग क्षमतेचे प्रभावी प्रदर्शन झाले. सौराष्ट्र किनाऱ्यावर झालेल्या या सरावाने तिन्ही दलांची वेगवान, अचूक आणि आधुनिक युद्धतयारी प्रत्यक्ष सिद्ध केली.
पुणे : भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या संयुक्त क्षमतेचे प्रभावी प्रदर्शन करणाऱ्या त्रिशुल या युद्धाभ्यासाची सांगता सौराष्ट्र किनाऱ्यावरील माधवपूर येथे झाली.