

Farmers Foreign Study Tour 2026
sakal
मंचर : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित परदेश अभ्यास दौऱ्यांतर्गत युरोप दौऱ्यावर गेलेल्या ५२ शेतकऱ्यांनी पॅरिस येथे गुरुवारी (ता.१९) मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसच्या मुख्य चौकात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि हा अनोखा सोहळा उपस्थितांचे लक्ष वेधून घेतला.