'कोरोनाशी दोन हात' करण्यासाठी भारतीय जैन संघटना सज्ज

coronavirus
coronavirus

पुणे - भारतीय जैन संघटनेतर्फे (बीजेएस) राज्यात 'कोरोनाशी दोन हात' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या कठीण काळात बीजेएसच्या वतीने गेल्या सहा महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. कोरोना हा केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची जनजागृती व कोरोनाबाबत असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याबाबत माहिती देताना बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथ्था म्हणले, "गेल्या 35 वर्षांपासून बीजेएस महाराष्ट्रात सक्रियपणे कार्य करत आहे. कोरोनाच्या काळातही संघटनेतर्फे कित्येक मोहीमा राबविण्यात आल्या. दरम्यान या संपूर्ण कालावधीत असे आढळले की पुण्यातील कोविड केअर सेंटरमध्ये पुणे जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच यात लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने सेंटरमध्ये बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे प्रशासनावरही ताण यतोय. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झाल्याने नागरिक तेथील कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास टाळतात, उपचार घेत नाहीत. तर काही जण शहरातील सेंटरमध्ये दाखल होतात. त्यातही काहींना लक्षणे नसल्याने ज्या रुग्णाला उपचाराचीगरज असते त्यांना बेड उपलब्ध होत नाही. याच अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करण्याकरिता तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या साहाय्यानेच तेथे 'कोविड केअर सेंटरची' उभारणी करण्याचा प्रयत्न उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. यासाठी बिजेएसतर्फे सामाजिक संस्थांच्या साहाय्याने या लोकांचे मार्गदर्शन आणि सेन्टरसंबंधीत माहिती व प्रशिक्षण देण्यात येईल."

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नव्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण 
राज्यातील विविध भागांमध्ये नवीन कोविड केअर सेंटरच्या उभारणीसाठी बीजेएसतर्फे लोकांची जनजागृती व मार्गदर्शन केले जात असताना तेथे आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना नेमणे हा देखील मोठा प्रश्न आहे. अश्यात ज्या नागरिकांना आरोग्यसेवा कर्मचारी म्हणून कार्य करण्याची इच्छा असेल त्यांना संघटनेच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार असून नव्या कोविड केअर सेंटरसाठी नेमले जाणार. यामध्ये रुग्णाची रोजची तपासणी, त्यांचे ऑक्सिजन प्रमाण व इतर सर्व गोष्टी शिकविण्यात येणार आहेत. तसेच हे कार्य करताना त्यांना देखील उत्पन्नाचा पर्याय मिळेल. असेही मुथ्था यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com