Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल
Ticket Booking: रेल्वे स्थानकांवरील आरक्षण केंद्रावर तिकीट काढण्याचा वेग लवकरच वाढणार आहे. 'क्रिस' प्रणालीद्वारे मिनिटाला दीड लाख तिकीट उपलब्ध होणार आहेत.
पुणे : रेल्वे आरक्षण केंद्रावरून तिकीट काढण्याच्या वेग आता वाढणार आहे. रेल्वेच्या ‘क्रिस’ या संस्थेने आरक्षण प्रणालीत आवश्यक तो बदल करण्यास सुरुवात केली आहे. मिनिटाला तब्बल दीड लाख तिकीट निघू शकतील, अशी अद्ययावत यंत्रणा तयार केली जात आहे.