
पुणे : ‘‘गुलामगिरीची मानसिकता इंग्रजांनी आपल्यावर सातत्याने लादली. परंतु, जगातील पहिली वैद्यकीय शस्त्रक्रिया भारतात दोन हजार ८०० वर्षांपूर्वी झाली. याचबरोबर पहिला शब्दकोश, पहिले स्टेडियम भारतात होते. गुलामगिरीच्या मानसिकतेमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडील वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना जगासमोर आणून समाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,’’ असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.