
पुणे : इस्राईल-इराण संघर्षाचा भारताच्या तांदूळ निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. इराण हा भारताचा तिसरा मोठा तांदूळ खरेदीदार आहे. भारतातून दरवर्षी निर्यात होणाऱ्या बासमती तांदळापैकी अंदाजे २५ टक्के तांदूळ इराणला पाठवला जातो. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्यात घटण्यास सुरुवात झाली आहे.