Pune News : ‘शिखंडी’चा राजस्थानात निनाद; पुण्यातील तृतीयपंथींच्या पथकाचे कावड यात्रेत दमदार वादन
Transgender Voices : ‘शिखंडी’ हे देशातील पहिले तृतीयपंथीय ढोल-ताशा पथक असून त्यांनी राजस्थानमधील कावड यात्रेत दमदार वादन करत इतिहास घडवला. या सादरीकरणातून त्यांनी समतेचा संदेश दिला आणि तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा एक सकारात्मक प्रयत्न केला.
Shikhandi group from Pune performs in Rajasthanesakal
पुणे : पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या ढोल-ताशांचा गजर आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून थेट राजस्थानात घुमला. देशातील पहिले तृतीयपंथींचे ढोल-ताशा पथक ‘शिखंडी’ने राजस्थानात कावड यात्रेत दमदार वादन करून उपस्थितांची मने जिंकली.