Pune News: फिजिओथेरपीतील नवे युग : संचेती रुग्णालयात रोबोटिक थेरपीसह वैयक्तिकृत पुनर्वसन सेवा सुरू
Sancheti Hospital: संचेती रुग्णालयात भारतातील सर्वांत प्रगत फिजिओथेरपी व पुनर्वसन विभागाची सुरुवात होत आहे. सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
पुणे : संचेती रुग्णालयातर्फे अत्याधुनिक फिजिओथेरपी आणि पुनर्वसन विभाग सुरू करण्यात येत आहे. या विभागाचे उद्घाटन मंगळवारी (ता. ५) रोजी सुवर्णपदक विजेता भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्या हस्ते होणार आहे.