Startup : इंडिक इन्स्पिरेशन : हस्तकला जपणारे स्टार्टअप

देशात तीन हजार प्रकारच्या हस्तकला आहे. हस्तकला करणारे जगातील ६० टक्के कलाकार भारतात आहेत. मात्र, जगातील ४८ बिलियन डॉलरपैकी केवळ दोन बिलियन डॉलरचा व्यवसाय भारतात होतो.
Indic Inspiration startup
Indic Inspiration startupsakal
Summary

देशात तीन हजार प्रकारच्या हस्तकला आहे. हस्तकला करणारे जगातील ६० टक्के कलाकार भारतात आहेत. मात्र, जगातील ४८ बिलियन डॉलरपैकी केवळ दोन बिलियन डॉलरचा व्यवसाय भारतात होतो.

पुणे - सांकृतिक वारसा असलेल्या अनेक हस्तकला देशात आहेत. विविध माध्यमांतून या कलेचे सादरीकरण केले जाते. मात्र, ही कला लोकांपर्यंत पोचण्यात येत असलेल्या अडचणी. असंघटित कलाकार. तयार केलेल्या वस्तूंना मिळत नसलेली योग्य बाजारपेठ. अशा अनेक कारणांमुळे आजही अनेक हस्तकला लोकांपर्यंत पोचल्या नाहीत. त्यामुळे ती कला स्थानिक भागापुरती मर्यादित राहिली किंवा तिचा ऱ्हास झाला आहे.

देशात तीन हजार प्रकारच्या हस्तकला आहे. हस्तकला करणारे जगातील ६० टक्के कलाकार भारतात आहेत. मात्र, जगातील ४८ बिलियन डॉलरपैकी केवळ दोन बिलियन डॉलरचा व्यवसाय भारतात होतो. कलाकारांच्या संख्येचा विचार करता व्यवसायाचा आकडा कमी आहे. त्यामुळे आपल्या देशाचा सांकृतिक वारसा असलेली हस्तकला जपली जावी. त्यातून अनेकांना रोजगार मिळावा. अनेक हस्तकलांचे जगात ब्रँड निर्माण व्हावे, यासाठी पुण्यातील इंडिक इन्स्पिरेशन (Indic Inspirations) हे स्टार्टअप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हस्तकला करीत असलेल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम हे स्टार्टअप करीत आहे.

विशेष म्हणजे २५ वर्ष आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात काम केलेल्या ५५ वर्षीय सुनील जालीहाल यांनी पत्नी पद्मजा यांच्यासह डिसेंबर २०१९ मध्ये या स्टार्टअपची स्थापना केली. संगणक अभियंता असलेल्या सुनील यांनी सीएमसी, विप्रो, सिमेन्य, ह्युलेट पॅकार्ड या कंपन्यांत नोकरी केली आहे. त्यानंतर त्यांनी मोबार्इल, टेलीकॉमवर आधारित तांत्रिक स्टार्टअपदेखील सुरू केले आहेत. तर पद्मजा जालीहाल यांनी वाणिज्य शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी काही वर्ष नोकरीदेखील केली.

४०० हून अधिक कलाकारांचे प्लॅटफॉर्म

स्थानिक हस्तकलांना व्यसपीठ मिळावे म्हणून जालीहाल कुटुंबीयांनी सुरुवातीला ‘हार्ड फॉर आर्ट’ या फाउंडेशनची स्थापना केली होती. मात्र, त्यामाध्यमातून काम करण्यात अडचणी येत असल्याने या स्टार्टअपची स्थापना केली. आतापर्यंत यामाध्यमातून ६५ हून अधिक हस्तकलांचे संवर्धन करण्यात येत आहे. तर ४०० हून अधिक कलाकार या स्टार्टअपशी जोडले गेले आहेत. भारतासह अनेक देशांतील वास्तू आणि घटनांचे शिल्प यामाध्यमातून तयार केले आहे.

देशातील कलाकारांची संख्या आणि विविध हस्तकलेचा विचार करता आपल्याकडे अजूनही खूप कमी प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नाहीत. योगा, शिवणकाम आणि शून्य यासारख्या अनेक बाबी आहेत, की ज्या भारताने जगाला दिल्या आहेत. त्यामुळे त्या अधिक व्यापक पद्धतीने जगापर्यंत पोचविणे गरजेचे आहे. आपल्या अनेक वस्तुंचे अद्याप ब्रँड तयार झालेले नाहीत. या सर्व बाबींचा विचार करीत आम्ही हस्तकलेचे क्षेत्र व्यापक बनविण्याचे प्रयत्न करीत आहोत.

- सुनील जालीहाल, सहसंस्थापक, इंडिक इन्स्पिरेशन

स्टार्टअपची वैशिष्ट्ये

  • हस्तकलेचे संवर्धन करते

  • ४०० हून अधिक कलाकार असलेले प्लॅटफॉर्म

  • अनेक कलाकारांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या

  • कला शिकण्यासाठी नवीन पिढी पुढे येत आहे

  • हस्तकलेच्या क्षेत्रातील आर्थिक उलाढाली वाढविण्यासाठी मदत

  • शहर आणि घटनांनुसार हस्तकलेचे शिल्प उपलब्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com