Indigo Airlines
sakal
पुणे - पुणे विमानतळाच्या एका ‘पार्किंग बे’वर इंडिगोचे एक विमान चार दिवसांपासून थांबून आहे. विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हे विमान एका ‘पार्किंग बे’ची जागा अडवून आहे. सध्या विमानांची वाहतूक कमी असली तरीही येत्या काही दिवसांत ती वाहतूक वाढणार आहे. तेव्हा ‘पार्किंग बे’ अशा रीतीने अडवून ठेवल्याने अन्य विमानांची, पर्यायाने प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.