बेल्ह्याच्या इंदिरानगर शाळेत जलपूजन
बेल्हे, ता. २६ : बेल्हे (ता. जुन्नर) परिसरातील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बेल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या कूपनलिकेला भरपूर पाणी लागल्याने ग्रामस्थांकडून ‘गंगा आली अंगणी !’ अशी भावना व्यक्त होत आहे. कूपनलिकेच्या पाण्याचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले.
इंदिरानगर (बेल्हे) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कूपनलिकेला लागलेल्या पाण्याच्या पूजनाप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पिंगट, सरपंच मनिषा डावखर, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी, कमल घोडे, अनन्या तपासे, समीर गायकवाड, अनिता पिंगट, कैलास आरोटे, नवनाथ शिरतर, पापाभाई कुरेशी, शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुटे आदी उपस्थित होते. याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी तसेच इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातील लहानग्या मुलांनाही पिण्याच्या पाण्याची गरज जाणवत होती. इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी बेल्हे ग्रामपंचायतीचे नेहमीच मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुटे व सहशिक्षिका सुरेखा कुटे यांनी सांगितले. दरम्यान याठिकाणी बेल्हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कूपनलिकेला ऐन उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर पाणी लागल्याने, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली असून, स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर मशिनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

