तारळे वृक्षारोपण
इंदोलीत वृक्षारोपण, नदी स्वच्छता
निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्र अध्यापकांचा उपक्रम
तारळे, ता. ६ : इंदोली (ता. कऱ्हाड) येथील कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रथम वर्ष ‘ज्ञानगंगा’ गटातील छात्र - अध्यापकांनी शालेय आंतरवासिता टप्पा-एक अंतर्गत इंदोली येथील न्यू इंग्लिश स्कूल पर्यावरण जनजागृतीवर सामाजिक उपक्रम उत्साहात राबविला. इंदोलीतील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
उपक्रमांतर्गत नदी स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी व ज्ञानगंगा गटातील छात्र-अध्यापकांनी श्रमदानाद्वारे नदी परिसरातील कचरा संकलन केले. स्वच्छतेचा संदेश दिला. शाळा परिसर व नदीकाठी वृक्षारोपण करून हरित व स्वच्छ वातावरण निर्मितीचा संकल्प केला.
या उपक्रमात (कै.) रामराव निकम शिक्षणशास्त्र बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील, मुख्याध्यापक घाडगे यांनीही सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
ज्योत्स्ना संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले. आशिष जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, समाजसेवा व पर्यावरण संवर्धनविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पर्यावरण जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले.
B01260
इंदोली : तारळी नदीकाठी वृक्षारोपण करताना छात्र अध्यापक.
......................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

