रविवारी नान्नजमध्ये शिवजन्मोत्सव निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन
WDL26B02712
इंदोरीकर महाराज
नान्नजमध्ये आज निवृत्ती महाराज (इंदोरीकर) यांचे कीर्तन
वडाळा ः नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे छत्रपती शिवजन्मोत्सवानिमित्त कीर्तनकार समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराज यांचे रविवारी (ता. १) रात्री साडेआठ वाजता सोलापूर बार्शी रस्त्यावरील जी. बी. घोडके विद्यालयाच्या प्राणांगणात कीर्तन होणार आहे. प्रकाश बाबू चोरेकर (शेठजी) शिवजन्मोत्सव मंडळ आणि शिवकृपा ग्रुप मित्र परिवार नान्नज यांच्या वतीने या संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या कार्यक्रमामुळे पंचक्रोशीतील भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नान्नज गावासह परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

