

Schools, colleges and dharmashalas will serve as relief centres as heavy rainfall continues to affect the pilgrimage town.
Sakal
आळंदी : इंद्रायणी नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने आणि दिवसभर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांच्या मुक्कामाची काहीशी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी थेट उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी आज शाळा, महाविद्यालये आणि धर्मशाळा अशा दहा इमारती अधिग्रहित करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे आता पुढील दोन दिवसांत बहुतांश वारकऱ्यांच्या निवासाची सोय चांगली होणार आहे.