Indrayani River Foams
sakal
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला पाच दिवस उरले असतानाच, पिंपरी-चिंचवड हद्दीतून सोडलेल्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीपात्रावर आज सलग दुसऱ्या दिवशी फेसाचे थर साचले आहेत. यामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.