इंद्रायणी नदीचे पाणी फेसाळले
आळंदी, ता. २० : विजया एकादशीला म्हणजेच आठ दिवसांपूर्वी आळंदी नगरपरिषद, देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने इंद्रायणीची स्वच्छता करण्यात आली. मात्र पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून रसायनयुक्त सांडपाणी इंद्रायणी नदीतून सोडल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पांढऱ्या रंगाचा फेस आला आहे. महापालिका हद्दीतील अनेक ठिकाणचे पाणी सध्या प्रक्रियेविना सोडल्याचे चित्र आहे. याचबरोबर उगमस्थानापासून अन्य ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपरिषद हद्दीतील सांडपाणीही अशाच पद्धतीने प्रक्रियेविना नदीपात्रात सोडले जात आहे. देहू, आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रातील नदीपात्राला या सांडपाण्यामुळे पूर्णतः गटाराचे स्वरूप आले आहे.
आज पहाटेपासूनच इंद्रायणी नदीत सिद्धबेट परिसरात पांढऱ्या रंगाचा फेस पाण्याला येत होता. त्याचबरोबर पाण्याला उग्र दर्पही येत आहे. पाणी मंदिराच्या दिशेला आल्यानंतर पुंडलिक मंदिर, गरुडस्तंभ भागामध्ये नदीपात्रातील पाणी काळवंडल्याचे दिसून आले. त्यामुळे इंद्रायणी नदीचे गटार झाल्याचे दिसून येत आहे.
शासनाचा नगर विकास विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कोणतेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. यामुळेच नागरिक एका बाजूला स्वच्छता मोहीम राबवीत असताना दुसऱ्या बाजूला महापालिकेसारखी जबाबदार आणि आर्थिकरित्या सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था मात्र बिनदिक्कत इंद्रायणी नदीपात्रात सांडपाणी सोडत आहे. त्यामुळे आळंदीत येणारा वारकरी तीर्थस्नानापासून वंचित रहात आहे. याचबरोबर मोई, निघोजे, चिंबळी, केळगाव, आळंदी ते तुळापूरपर्यंतच्या ग्रामपंचायत हद्दीतील विहिरी तसेच बोअरवेलच्या पाण्याचा स्तरही खालावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

