पुण्यातील लॉकडाउनमध्ये नेमके काय सुरू आणि काय बंद राहणार; वाचा सविस्तर

loc.jpg
loc.jpg

पुणे ः कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात 13 जुलै मध्यरात्र ते 23 ते जुलै दरम्यान लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने घोषित केला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होईल, याचा आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी रविवारी रात्री प्रसिद्ध केला. त्यात उद्योग- आयटी सुरू राहणार असल्याचे म्हटले असून पेट्रोल पंप आणि गॅस पंपही पासधारकांसाठी सुरू राहणार आहेत. तसेच दूध आणि वृत्तपत्रांचे वितरण घरोघरी करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 

हे राहणार बंद
- किरणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे (14 ते 18 जुलै)
- ऑनलाईन खाद्यपदार्थ, वस्तूंची डिलिव्हरी
- मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रिडांगणे आदी
- हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल
- सलून, ब्यूटी पार्लर
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
- दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद (फक्त पासधारकांनाच परवानगी)
- बांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासीच व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार)
- मंगल कार्यालये, लग्न समारंभ आदी

-सर्व खासगी कार्यालये

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हे राहणार सुरू
- पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार (फक्त पासधारकांनाच इंधन, गॅस मिळणार)
- दूध आणि वृत्तपत्रांचे घरपोच वितरण
- सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, ऑनलाईन औषध सेवा
- मेडिकल दुकाने, औषधांची घरपोच डिलिव्हरी
- गॅस वितरण
- बॅंका, एटीएम
- माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचाऱ्यांसह

यांना बाहेर फिरता येईल
- डॉक्‍टर, नर्स, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाने विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा, शहरातून जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे कामगार (पोलिस पाससह), जीवनावश्‍यक वस्तू, पार्सल, डबे पुरविणारे (पोलिस पाससह).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com