police crime on illegal construction
sakal
पुणे - कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण याने सय्यदनगर भागात केलेली बेकायदेशीर बांधकामे काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने शुक्रवारी (ता. २६) पाडून टाकली. ‘शहरात गुंडगिरी आणि बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घातले जाणार नाही. कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई होईल,’असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.