संपातपजनक! 10-12 दिवसाचे स्त्रीजातीचे अर्भक मंदिरात दिले सोडून

निलेश कांकरिया
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

कोलवडी साष्टे (ता. हवेली) मधील बोरमलनाथ मंदिरात 10 ते 12 दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. तेथील एका कुटुंबाने त्याला काही काळ सांभाळले. नंतर ते लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस त्याला ससून रुग्णालयात दाखल करणार असून मुलीची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसानी सांगितले.       

वाघोली : कोलवडी साष्टे (ता. हवेली) मधील बोरमलनाथ मंदिरात 10 ते 12 दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. तेथील एका कुटुंबाने त्याला काही काळ सांभाळले आणि नंतर ते लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अर्भकास ससून रुग्णालयात दाखल करणार असून तीची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसानी सांगितले.          

बोरमलनाथ मंदिरात अर्भक आढळल्यानंतर मंदिराच्या मागे राहणाऱ्या एका कुटुंबाने त्याला घरी नेले. ही बाब ग्रामपंचायत कर्मचारी सुनीता लांडगे व पूजा पवार यांना समजातच त्यांनी सरपंच सुरेखा गायकवाड, उपसरपंच नीता गायकवाड व माजी उपसरपंच संजय रिकामे यांना सांगितले. त्यांनी लोणीकंद पोलिसांना कळविले. पोलिस येईपर्यंत त्या कुटुंबाने तीची काळजी घेतली. 

पोलिसांनी पंचनामा करून ससून बाळाला रुग्णालयात पाठविले. दरम्यान, अनैतिक संबंधातून ती जन्माला आल्याने मंदिरात सोडल्याची चर्चा आहे. लोणीकंद पोलिस तपास करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infant of 10-12 days was left in a temple in Pune