Daund News : कॅनॅालच्या पोटचारीत अर्भक व अर्भकांचे अवयव प्लॅस्टिक बरण्यांमध्ये आढळले

दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत जिजामाता नगर येथील कॅनॅालच्या पोटचारीतील उकांड्यावर प्लास्टिक बरण्यांमध्ये अर्भक व अर्भकांचे अवयव आढळले.
Daund Crime
Daund Crimesakal
Updated on

दौंड - गोपाळवाडी (ता. दौंड) येथे नागरी भागातील उकांड्यावर एक मृत अर्भक व अन्य अर्भकांचे अवयव आढळून आले आहेत. प्लॅस्टिक बरण्यांमध्ये ही अर्भके टाकून फेकून देण्यात आली होती.

दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत जिजामाता नगर येथील कॅनॅालच्या पोटचारीतील उकांड्यावर प्लास्टिक बरण्यांमध्ये ही अर्भके होती. एका कचरा वेचकाला पुठ्ठ्याच्या बॅाक्समध्ये अर्भके असलेल्या बरण्या आढळल्या.

महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणार्या ११२ या क्रमांकावर या संबंधी माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस उप अधीक्षक बापूराव दडस व दौंड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

याबाबत दौंड उपविभागाचे पोलिस उप अधीक्षक बापूराव यांना विचारले असता ते म्हणाले, प्रथमदर्शनी एका बरणीत एक मृत अर्भक व अन्य सात ते आठ बरण्यांमध्ये मानवी अवयव आहेत. मृत अर्भक हे मुदतीपूर्वी जन्माला (प्रीमॅच्युअर) आले होते किंवा नियमित प्रसूती झालेले अर्भक आहे, याची पडताळणी केली जाणार आहे.

या बरण्या पंचनामा करून उप जिल्हा रूग्णालयाकडे देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी या बाबत अहवाल देतील. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दौंड शहराला लागून असलेल्या गोपाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत लोकवस्ती मध्ये ही अर्भके आढळल्याने अवैध गर्भपात आणि काही रूग्णालये व दवाखाने यांच्याकडून राजरोसपणे उघड्यावर टाकले जाणारा जैव वैद्यकीय कचर्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com