

पुणे: दौंड येथे बरणीत आढळलेले पुरुष अर्भक हे पाच वर्षांपूर्वीचे असून एका गर्भवतीने त्याला ते केवळ १८ ते २० आठवड्याचे असताना त्याला दौंडमधील गोपाळवाडी येथील खासगी रुग्णालयात जन्म दिला होता. रुग्णालयाने ते अर्भक फॉर्मलीन या द्रावणात जतन करून ठेवले होते. रुग्णालयाच्या परिचारिका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत होता. जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य विभागाला सादर केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरोग्य शरीरशास्त्र व जैववैद्यकीय कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.