महागाईच्या प्रश्नावर राष्ट्रवादी आवाज उठवणार- खासदार सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुळे

महागाईच्या प्रश्नावर राष्ट्रवादी आवाज उठवणार- खासदार सुळे

कोथरूड : मला भेटायला येणा-या महिला म्हणतात, ताई, या महागाईवर मार्ग काढा. भाज्या बरोबर औषधे सुध्दा महाग झाले आहेत. घरखर्च भागवणे अवघड झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जनतेच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतले आहे त्याला जागवण्याचे काम राष्ट्रवादी रस्त्यावर येवून करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने कोथरूडला महागाई प्रश्नावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या विषयाकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहेत., असा आरोप खासदार सुळे यांनी यावेळी केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते शंकर केमसे, काका चव्हाण, हर्षवर्धन मानकर, विजय डाकले, माजी नगरसेविका जयश्री मारणे, ज्योती सुर्यवंशी तसेच आंदोलनासाठी आलेले पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या की, तुम्ही केले तर जन कल्याण विरोधकांनी केले तर रेवडी वाटप म्हणायचे. हा अन्याय आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या यंत्रणांच्या फक्त राजकारण्यांनाच नव्हे तर मिडीयावाल्यांना सुध्दा नोटीसा जात आहेत. अटक केली जात आहे. संविधानाने, डॉ. आंबेडकरांनी जो हक्क दिला, तो आवाज दाबण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे अध्यक्ष नढ्ढा म्हणतात की, एक पार्टी एक देश. आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्ही एक देश अनेक पार्टी चा पुरस्कार करतो.

संयोजक शंकर केमसे म्हणाले की, या सरकारच्या काळात जगणं अवघड, मरण सोप झाले आहे. ज्वारी, मुग, साखर सगळेच महाग झाले. मोदीजी तुमच्या राज्यात स्वस्त काय आहे ते सांगा. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे एवढेच यांचे धोरण आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत.

भुसारी कॉलनीत राहणा-या सुरेखा शेडगे रस्त्याने चालल्या होत्या. महागाई विरोधातील आंदोलनात त्या घुसल्या व सुप्रिया ताईंना त्यांनी आपली व्यथा सांगितली. शेडगे म्हणाल्या की, घरामध्ये एकच कमावता आहे. आम्ही म्हातारा, म्हातारी आता काम करु शकत नाही. घरात जे उत्पन्न येते त्यात घरखर्च भागत नाही. पुर्वी औषध आणायला पैसे शिल्लक रहायचे. आता पैसेच उरत नसल्याने ओढाताण होते. त्यामुळे मी सुप्रिया ताईंना म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, गँस, तेल यांची होणारी महागाई कमी करण्यासाठी काही तरी करा.

चांदणी चौकातील पुल पडला तर सर्व प्रश्न सुटतील का. पुर्ण नियोजन करुन पुल पाडा. लोकांची आणखी अडचण करु नका.

इडी सरकारने महाराष्ट्राच्या इज्जतीला काळीमा फासली. ५० खोके नॉट ओके. महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस. इडीचे सरकार देशाला शोभणारे नाही.

एका आमदाराने महिलांबद्दल गैर उद्गार काढले. त्याचा त्याच्या मतदार संघात जावून करेक्ट कार्यक्रम करणार.

कोर्ट आम्हाला पाच वर्षे हटवू शकत नाही असे सांगणे म्हणजे कोर्टाचा अपमान आहे. ईडी, सीबीआयचे निर्णय यांना माहित होतात. आता कोर्टाचे निर्णय माहित होत असतील तर हा कोर्टाचा अपमान आहे. आम्ही तो सहन करणार नाही.

सरकारी यंत्रणेतील माहिती लीक होतेच कशी याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे.

रोहीत पवारांची चौकशी सुरु असल्या बद्दल आम्ही न्यूज चँनेलवरच पाहिले. नोटीस आली तर सहकार्याचीच आमची भूमिका असते.

Web Title: Inflation Issue Ncp Will Raise Its Voice Organized In Kothrud Mp Sule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..