
पुणे - ‘इक्षुदंड ते इथेनॉल - साखर उद्योगाची भरारी’ हे पुस्तक म्हणजे साखर उद्योगाच्या एकत्रित माहितीचा ग्रंथ आहे. सर्व साखर अभ्यासकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे, अशी अपेक्षा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १५) येथे बोलताना व्यक्त केली.
राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड व साखर सह संचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे आज पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘वसंतदादा’चे उपाध्यक्ष व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे,राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, ‘वसंतदादा’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, ‘‘माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी साखर उद्योगात अनेक वर्ष काम केले आहे. साखर धंद्याबाबतच्या इतिहासाची संपूर्ण एकत्रित माहिती असलेला ग्रंथ त्यांनी तयार केलेला असून तो मी चाळलेला आहे. साखर अभ्यासकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे.’’
दरम्यान, मांजरी येथील वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर हे पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. साखर उद्योगाविषयी पहिल्यांदाच संपूर्णपणे एकत्रित माहिती असलेले हे पुस्तक आहे.
यामध्ये सुमारे पाच हजार वर्षाचा इतिहासाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तीन वर्ष सखोल अभ्यास केला आहे. जागतिक साखर उद्योग, साखरेचे उपपदार्थ, साखर उद्योगाची स्थित्यंतरे आणि भविष्याचा वेध या पुस्तकात घेतला असल्याचे शेखर गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.