अक्कलकोट माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महिला विभागाच्या अध्यक्षपदी अॅड.फारीयाशाजनिन टिनवाला यांची नियुक्ती
ॲड. टिनवाला
AKK26B05929
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या अध्यक्षपदी टिनवाला
अक्कलकोट ः माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने अक्कलकोट तालुका महिला विभागाच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. फारीयाशाजनिन म. इक्बाल टिनवाला यांची नियुक्ती केली आहे. महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष बसवेकर, कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. ॲड. टिनवाला अक्कलकोट तालुक्यात महिला विभागाच्या अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांना हे पद मानद स्वरूपात देण्यात आले असून, भारतीय संविधान, भारतीय कायदे तसेच महासंघाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी प्रभावी वापर करणे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे आणि पदाची जबाबदारीने अंमलबजावणी करणे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

