पुणेकरांनो, पाहा कोणत्या रुग्णालयात किती बेड्स शिल्लक आहेत?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

- शिल्लक बेड्सची माहिती लिंकवर उपलब्ध
- कोरोना बाधित रुग्णांसाठी सुविधा

पुणे : कोरोना बाधित व्यक्तीस रुग्णालयात दाखल करायचं म्हटलं की बेड शिल्लक नाही, असे उत्तर मिळते. बेड उपलब्ध न झाल्यामुळे काही रुग्णांना जीवही गमवावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने आता कोणत्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड्स, आयसीयू व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध आहेत, याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोविड केअर सॉफ्टवेअरच्या लिंकवर उपलब्ध केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. या संकेतस्थळाच्या डॅशबोर्डवर पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाचे क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच कोणत्या रुग्णालयात किती बेड्स शिल्लक आहेत, मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असलेली रुग्णालये, सरकारने सामंजस्य करार केलेली खासगी रुग्णालये, कोणत्या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकतो, ही माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे जिल्ह्यात सध्या आयसीयू व्हेंटीलेटर बेड्सची संख्या खूपच कमी आहे. केवळ दोन-तीन रुग्णालयांमध्ये काही आयसीयू व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध आहेत.

या लिंकवर क्लिक करा
https://www.divcommpunecovid.com/ccsbeddashboard/hsr

 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information on which hospital has Oxygen Beds ICU Ventilator Beds is available on the Covid Care Software