
पुणे : फुकेत आणि अंदमान निकोबार येथे पर्यटनासाठी गेलेल्या दोन दाम्पत्यांना विशेष विमानसेवा देत पुण्यात उपचारांसाठी आणण्यात यश आले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे दोघांनाही तातडीची सेवा मिळण्यास मदत झाली. दोन्ही दाम्पत्यांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.