

इनर इंजिनिअरिंग... लोगो
सद्गुरू, ईशा फाऊंडेशन
व्यक्ती नव्हे, तर
परिस्थितींची पारख
सद्गुरू : वस्तू वापरण्यासाठी तयार केल्या आहेत आणि माणसे प्रेम करण्यासाठी; परंतु गैरसमज इतका खोलवर रुजला आहे, की माणसांचा वापर केला जात आहे आणि वस्तूंवर प्रेम केले जात आहे. तुम्ही लोकांना त्यांच्या पत्नी किंवा पतीला घटस्फोट देताना पाहिले असेल; पण कोणी स्वतःच्या पैशाला घटस्फोट दिलेला पाहिला आहे का? नाही. आपण माणसांचा उपयोग करतो आणि वस्तूंवर प्रेम करतो.
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे प्रथम तिच्या शरीराच्या माध्यमातून पाहता, तेव्हा तुमचे मन क्षणार्धात म्हणते, ‘अरे! ही सुंदर आहे, ही कुरूप आहे, ही तरुण आहे किंवा ही वृद्ध आहे...’ हे सर्व एका क्षणात मनामध्ये घडून जाते. जर तुम्ही तिच्या वागण्याबद्दल किंवा बोलण्याबद्दल मत बनवायला सुरुवात केली, तर असंख्य प्रकारची मते मनात येऊ लागतात - तुम्हाला ती आवडते, आवडत नाही, तिचा तिरस्कार वाटतो किंवा तिच्याविषयी प्रेम वाटते.
म्हणून तिच्या शरीराकडे, मनाकडे किंवा भावनांकडे पाहू नका. सर्वप्रथम या व्यक्तीमधील अस्तित्वाच्या गाभ्याला स्पर्श करा. या व्यक्तीमध्ये जे जीवनाचे बीज आहे, त्याला प्रथम नमन करा. जीवनाचा स्रोत जो आहे, त्यालाच तुम्ही ईश्वर म्हणता, नाही का? जीवनाचा तो स्रोत किंवा बीज आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आहे. सर्वप्रथम त्यालाच नमन करा. तुमचा पहिला संबंध त्याच्याशी असू द्या. त्यानंतरच त्या व्यक्तीच्या इतर पैलूंशी संबंध प्रस्थापित करा.
शरीर किंवा मन कदाचित योग्य स्थितीत नसेल; पण त्याबद्दल तुमच्या मनात कोणताही प्रश्न नसावा. ही व्यक्ती कदाचित तुमच्या संस्कृतीची नसेल किंवा तिच्याविषयी तुमच्या काही आवडी-निवडी असतील. ते ठीक आहे, कारण सर्वप्रथम तुम्ही जीवनाच्या मूलभूत स्रोताला नमन केले आहे. हे एखादे मत, हे कोणाचे मूल्यमापन नाही. हे जीवनाविषयीचे अधिक सखोल आकलन आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता, तेव्हा सर्वप्रथम तिच्यामधील जीवनाच्या स्रोताला वंदन करता. त्याच्यासोबत तुमचा कोणताही संघर्ष नसतो, कोणतेही मत नसते.
कोणतीही व्यक्ती कायम एकसारखी नसते. आज ती कदाचित अशी असेल, जे तुम्हाला आवडणार नाही. उद्या सकाळी ती अत्यंत सुंदर मनःस्थितीत असू शकते; पण जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही तिला आधीच ओळखले आहे आणि तिच्याविषयी एक छाप मनात तयार केली आहे, तर ती व्यक्ती या क्षणी जशी आहे, तशी तुम्हाला कधीच दिसणार नाही. एकदा तुम्ही या सापळ्यात अडकलात, की त्यातून बाहेर पडणे कठीण होते.
तुमचे मन इतरांविषयी मत बनवत असेल, तरी त्याला महत्त्व देऊ नका. कारण एकदा तुम्ही मत बनवण्यास सुरुवात केली, की शेवटी ते फक्त दोनच प्रकारचे असतात - हे चांगले आहे किंवा हे वाईट आहे. जे काही तुम्हाला चांगले वाटते, त्याकडे तुम्ही स्वाभाविकपणे आकर्षित होता आणि त्याच्याशी आसक्त होता. आणि जे काही तुम्हाला वाईट वाटते, त्यापासून तुम्ही दूर जाऊ लागता आणि नकारात्मक भावना वाहू लागतात. म्हणूनच लोकांविषयी मत बनवण्याची गरज नाही. परिस्थितीविषयी मत बनवणे आवश्यक असू शकते; पण व्यक्तींविषयी मत बनवण्याची आवश्यकता नाही.
------------
जयदेव पंचवाघ लेख हेडिंग
-------------------
‘कॉडा इक्वायना’चे
कारण आणि उपचार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.