

‘इनरव्हील’च्या उपक्रमांना
पालिकेचे सर्वतोपरी सहकार्य
नगराध्यक्ष शिंदे; महाबळेश्वरमध्ये सत्कार
महाबळेश्वर, ता. ६ : इनरव्हील क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या समाजसेवी उपक्रमांना महाबळेश्वर पालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिले.
महाबळेश्वर पालिकेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ पालिका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे उपस्थित होत्या.
याप्रसंगी उपाध्यक्ष नासिरभाई मुलाणी, संतोष शिंदे, अॅड. संजय जंगम, रोहित ढेबे, रवींद्र कुंभारदरे, विमलताई पार्टे, स्मिता पाटील, पल्लवी कोंढाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी क्लबच्या वतीने नांदवळ येथील अनाथाश्रमासाठी मदतीचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती दिली. या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नगरसेवकांना केले. त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व नगरसेवकांनी तत्काळ आर्थिक मदत देऊन उपक्रमास मोलाचे सहकार्य केले. या योगदानाबद्दल इनरव्हील क्लबच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या वेळी क्लबच्या उपाध्यक्षा मुक्ता कोमटी, सचिव सपना अरोरा, रोहिणी वैद्य, सविता पल्लोड, आदिती भांगडिया, वंदना पल्लोड, मनीषा कोमटी, गायत्री जाधव, स्मिता जाधव आदी सदस्य उपस्थित होत्या.
फोटो :..........04983
महाबळेश्वर : पालिका सभागृहात नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, सदस्य.
..................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.