Aircraft Safety : विमानाच्या खिडकीची चौकट निखळली; गोव्याहून पुण्याला येताना २३ हजार फूट उंचीवरील घटना

Spice Jet SG-1080 : गोवा-पुणे विमान (SG-1080) उड्डाणादरम्यान खिडकीची आतील चौकट निखळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Aircraft Safety
Aircraft SafetySakal
Updated on

पुणे : गोव्याहून पुण्याला येणारे विमान (एसजी-१०८०) २३ हजार फूट उंचीवर असतानाच एका खिडकीची आतील चौकट निखळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खिडकीला बाहेरचा (आउटर) व मधला (मिडल) असे आणखी दोन प्रकारची आवरणे असल्याने खिडकीतून बाहेरील हवा विमानात शिरली नाही. त्यामुळे विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com